युनिफाईट स्पर्धेत पेणच्या खेळाडूंची सुर्वण झेप
पेण : नुकतीच सातारा वाई येथे युनिफाईट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र व युनिफाईट वेलफेअर असोसिएशन सातारा ह्याने आयोजित केलेल्या 9व्या राजस्तरिय युनिफाईट स्पर्धेत पेण ,जोहे, जिते येथील युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशन ह्या संस्थेत शिहान रविंद्र म्हात्रे (पप्पू सर) व सेन्साय प्रथमेश मोकल ह्यांच्या कडे युनिफाईट ह्या खेळाचे प्रशिक्षण घेत आसलेले खेळाडू कु. रितुल रविंद्र म्हात्रे,यश उदय जोशी, वंश संजय घरत, श्रीतेज मोरेश्वर पाटील,दिपेंद्र दीपक सावंत ह्या चारही खेळाडूंनी नी सुवर्ण पदक पटकाऊन आपल्या रायगड जिल्ह्या सोबत पेण तालुक्याचे नाव उंचावले. ह्या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. युवराज नाईक, युवा नेते ईशान भोसले, महाराष्ट्र युनिफाईट चे अध्यक्ष श्री. संतोष खंदारे सर, सचिव डॉ. मंदार पनवेलकर, सातारा युनिफाईट चे अध्यक्ष संदिप भाऊ शिंदे, सचिव नितीन सर तसेच जिल्ह्यातील सन्मानिय मान्यवर उपस्थित होते ह्या विजय स्पर्धकांची हिमांचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे त्यांच्या ह्या निवडी मुळे त्यांचे सर्व स्तरातून कैतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.