बेक केमिकल कंपनीतून सकाळच्या धुक्याचा फायदा घेऊन सोडले जातेय भयानक प्रदूषण 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

धाटाव/रोहा : किरण मोरे

धाटाव औद्योगिक परिसरातील बेक केमिकल कंपनीतून सकाळच्या धुक्याचा व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भयानक प्रदूषण सोडले जात आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

धुक्यातून प्रदूषणाचा अनुभव येथील नागरिकांना नेहमीच येत असून सकाळी मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणाच्या हातचालाखीकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा येथील स्थानिकांचा आरोप आहे. 

प्रदूषण हे या परिसरातील नागरिकांच्या पाचवीला पूजल्याची संतप्त प्रतिक्रीया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाढत्या प्रदुषणामुळे या परिसरामध्ये दमा, खोकला यांसारखे श्वसनाचे आजार वाढुन येथील वैद्यकीय यंत्रणाना श्वसनाचा आजार सुरु झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. याचा त्रास प्रामुख्याने लहान बालके व वृद्ध मंडळींना होत आहे. बेक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण बाहेर पडत असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आलेले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog