खांब-सुकेळी परिसरात अवकाळी पाऊस, पावसामुळे कडधान्य पिकाला धोक्याची घंटा, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, जनजीवनावर परिणाम
कोलाड : निलेश महाडीक
बळीराजाच्या नशिबी सुगीचे दिवस नाहीच. या ना त्या कारणाने बळीराजा कायम ग्रासला आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे संकट येत-जात असतात मात्र तो कधीच खचून जात नाही. संपूर्ण जगाचा पोशिंदा समजला जातो, सर्वांचीच भूक भागवण्याचे काम कष्ट करत तो भागवत असतो. मागील दोन वर्षे त्याच्यावर अनेक संकट आले, त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर शनिवार दि. ८ जानेवारी रोजी खांब सुकेळी परिसरात दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. धुवांधार अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
सकाळी थंडी व नंतर पाऊस यामध्ये यामुळे लोकांच्या जीवनमानावर परिणाम होताना दिसत असून यामध्ये कोरोनाही लोकांची साथ सोडण्यास तयार नाही. यातच भरीत भर म्हणून काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी-बागायतदारांच्या कडधान्य व भाजीपाला या पिकांना धोका निर्माण झाला असून यामुळे शेताकऱ्यांच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच विटभट्टी व्यवसायिक यांचीही चिंता वाढली आहे.