डॉ. प्रेमळ मुसळे यांचा रायगड जिल्हा भोई समाजातर्फे सन्मान
कोलाड : निलेश महाडीक
रोहा तालुक्यातील गोवे गावची सुकन्या कु. प्रेमळ सुरेश मुसळे हीने (बी.ए.एम.एस.मुंबई) ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे तिचा रायगड जिल्हा भोई समाजा तर्फे सन्मान करण्यात आला.
रायगड जिल्हा भोई समाज सेवा संस्था यांची ६२ वी वार्षिक परिषद व १७ वी वार्षिक अहवाल सभा रोहा तालुक्यातील म्हस्करवाडी येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर मधुकर कनोजे व कार्यक्रमाचे उदघाटक खा. सुनिलजी तटकरे हे होते. या कार्यक्रमात गोवे गावची सुकन्या व सध्या ठाणे येथे राहणारी कु. प्रेमळ सुरेश मुसळे ही बी.ए.एम.एस.मुंबई ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे म्हस्करवाडी येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार सुनिलजी तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, भोई समाज सेवा संस्था या समाजाचे कार्य दिवसेंदिवस प्रगती पथावर जात असून या समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे व आम्ही कुठेही कमी नाही हे एका खेडेगावातील मुलगी प्रेमळ सुरेश मुसळे हिने डॉक्टर होऊन हे सिद्ध केले आहे. तिच्या या जिद्दीचे कौतुक करावे हे थोडे आहे. यावेळी कोलाड परिसरातील राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य युवा कार्यकर्ते तसेच भोई समाजाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व रायगड जिल्ह्यातील असंख्य भोई समाजबांधव उपस्थित होते.