बेणसे ग्रामपंचायतिच्या वतीने अपंग व्यक्तींना धनादेश व गृहपयोगी वस्तू वाटप
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा आलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग व्यक्तींना १०,००० रु धनादेश व गृह उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मा. बांधकाम सभापती संजय जांभळे, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, रायगड जिल्हा युवासेना अधिकारी सुधिर ढाणे, कामगार नेते दीपक राणावडे, पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, आलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले,बेणसे सरपंच मधुकर लोभी, अशोक भोय, उद्धव कुथे, अरुण कुथे, रायगड जिल्हा महिला संघटीका दिपश्री पोटफोडे, मा.उप जिल्हा संघटीका कल्पना पाटील, पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके, पेण तालुका संघटिका महानंदा तांडेल, प्रीती कुथे, युवासेना अधिकारी पेण तालुका राजेंद्र वालंज विभागातील शाखा प्रमुख, महिला शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.