सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुंडलिका विद्यालय पाटणूस येथे राष्ट्रीय कबड्डी खेळाडूचा सत्कार 

शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, बूट व शालोपयोगी वस्तूंचे वाटप

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील कुंडलिका विद्यालय पाटणूस येथे सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे चेअरमन सुरेश म्हामुणकर, सहसचिव आंदेश दळवी, संचालिका आरती म्हामुणकर, मुख्याध्यापक अभिमान मोराळे, लोणावळे गुरुकुल विद्यालयाचे शिक्षक रंगनाथ वरे, सौ. सुनीता वरे, रमेश बोन्द्रे, रवी शेळके, सौ. सोनाली शेळके, निखिल शेळके, कुंडलिका विद्यालयाचे शिक्षक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. 

कुलाबा दिव्यांग क्रीडा असोसिएशन महाराष्ट्र व मुंबई दिव्यांग पॅरा कबड्डी संघ पुष्कर, राजस्थान येथे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कबड्डी स्पर्धेत माणगाव तालुक्यातील विहूले गावचा सुपुत्र व कुंडलिका विद्यालय पाटणूसचा माजी विद्यार्थी कबड्डी खेळाडू ओंकार चंद्रकांत महाडिक याची महाराष्ट्र राज्य संघात निवड होऊन राष्ट्रीय पातळीवर कबड्डी खेळण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल त्याचा यावेळी विद्यालयाचे चेअरमन सुरेश म्हामुणकर यांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लोणावळे गुरुकुल विद्यालयाचे शिक्षक वृंद यांचे वतीने विद्यालयातील आदिवासी विद्यार्त्यांना गणवेश, बूट व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याच दिवशी बालदिन असल्याने ईश्वरी दिगंबर खटके या छोट्या मुलीला पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. 

ओंकार महाडिक या तरुणांची राष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून निवड झाल्याने उपस्थित मान्यवरांनी त्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. सहसचिव आंदेश दळवी म्हणाले की, या तरुणाने राष्ट्रीय पातळीवर उत्तम खेळ करून आंतरराष्ट्रीय संघात जागा निर्माण करून आपल्या देशाचे नाव करून देशाचा तिरंगा आणून पाटणूसच्या हुतात्मा स्मारकावर लावावा अशी माझी इच्छा आहे. ओंकार च्या विहूले गावातून व पाटणूस पंच क्रोशीतुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog