निलेशभाई महाडीक यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार
कोलाड : प्रतिनिधी
येथील पुई गावचे सुपुत्र समाजसेवक निलेशभाई महाडीक यांना जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नागमठाण ता, वैजापूर जि, औरंगाबाद या संस्थेकडून १ जानेवारी २०२२ रोजी आदर्श समाजसेवक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार समारोहात त्यांना हा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कैलास प्रजापती, वैजापूर माजी सभापती श्री. संजय निकम, मुंबई येथील समाजसेविका श्रमिका दळवी, आयोजक सुर्यकांत पाटील आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करून व मशाल पेटवुन करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
निलेशभाई महाडीक हे सामाजिक कार्यांत अग्रेसर असून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा दबदबा निर्माण झालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन माजी आमदार अवधूतदादा तटकरे, युवा नेते संदीपशेठ तटकरे, त्यांचे सहकारी प्रसाद खुळे, ॲड. रेवतीताई तटकरे, संजय कणघरे, गौरव नाईक, ईकिंदर शेवाले, निलेश पवार, संदिप कणघरे, रोहीत पवार आंदिनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.