वरसे ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर नळ जोडण्या!

रोहा : समीर बामुगडे 

वरसे ग्रामपंचयात कार्यक्षेत्रात तब्बल १ हजाराहून अधिक चोरीच्या नळ जोडण्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिवाय वर्षाला ग्रामपंचायतीला सरासरी ३ ते ५ कोटीच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. या परिस्थितीला पंचायत समितीतील काही "लबाड" अधिकारी, भुमाफिया आणि पाणीमाफिया जबाबदार असुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र चव्हाण यानी केली आहे. 

वरसे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकाम करणारे भुमाफिया आणि बांधकामांना पाणी विभाग, अनधिकृत बांधकाम विरोधी विभागात कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी यांचे अभय आहे. यामध्ये मोठे अर्थकारण आहे. भुमाफिया, पाणीमाफिया आणि अधिकारी याचे रॅकेट स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रचंड नुकसान करीत आहेत. याचा पर्दाफाश रविंद्र चव्हाण यानी केला आहे. २००५ पासुन या रॅकेटच्या विरोधात ते लढत आहेत, मात्र प्रशासन प्रामाणिक कर भरणाऱ्या नागरिकांचे हित जपण्याऐवजी भुमाफिया, पाणीमाफिया आणि अधिकारी या रॅकेटला पाठीशी घालत आहेत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तब्बल १ हजाराहून अधिक चोरीच्या नळ जोडण्या असल्याचा दावा रविंद्र चव्हाण यानी केला आहे.

प्रत्येक प्रभाग निहाय अनधिकृत बांधकामे आणि चोरीच्या नळ जोडण्यांबाबतची माहिती रविद्र चव्हाण यांनी प्रशासनाला सादर केली आहे. अनधिकृत बांधकामाच्या व चोरीच्या नळ जोडण्याचे दर धक्कादायक आहेत. एक इंची नळ जोडणीसाठी ५० हजार आणि अर्ध इंची नळ जोडणीसाठी २५ हजार उकळले जातात. हे सर्व पैसे भूमाफिया, पाणीमाफिया, अधिकारी या रॅकेटच्या घशात जातात. यामुळे वर्षाला ग्रामपंचायतीचा सरासरी ३ ते ५ कोटीचा महसुल बुडत आहे. ही गंभीर बाब असुनही ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुस्त आहे. चोरीच्या नळ जोडण्यांमुळे प्रमाणिक करदात्यांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. सद्यस्थितीत वरसे ग्रामपंचायतीत तीव्र पाणी टंचाई आहे. जर चोरीच्या नळ जोडण्या तोडल्या तर पाणी टंचाई दुर होईल असे म्हणत रविंद्र चव्हाण यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

संबंधित प्रशासन विभागाने चौकशी करुन बेकायदेशीर नळ जोडण्या अनधिकृत बिल्डर लॉबीवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे संबंधित प्रशासन याचा शोध घेईल का?  असे सर्वत्र चर्चिले जात आहे तरी प्रशासन गाभिर्याने घेत नाही असा आरोप नागरिकांकडून होत आहे,

Popular posts from this blog