ज्येष्ठ समाजसेवक यशपाल साळवी यांच्या षष्ठ्यब्दिपूर्ती सोहळ्याचे आयोजन
माणगांव : उत्तम तांबे
माणगांव तालुक्यातील टोलखुर्द येथील ज्येष्ठ समाजसेवक यशपाल शंकर साळवी यांचा शनिवार दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता षष्ठ्यब्दिपुर्ती सोहळा त्यांच्या राहत्या घरी आयोजित केला आहे .
माजी सैनिक, टोलखुर्द माजी सरपंच शंकर भाऊ साळवी यांचे सुपुत्र यशपाल शंकर साळवी यांचा जन्म २२ जानेवारी १९६२ साली महाड तालुक्यातील वीर येथे झाला. त्यांनी गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन ते उच्च शिक्षक बनले शिक्षक म्हणून सहशिक्षक ते पदोन्नती मुख्याध्यापक अशी छत्तीस वर्ष त्यांनी प्रामाणिक सेवा केली. या प्रामाणिक सेवेमुळे रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबाग चेअरमन, अखिल प्राथमिक शिक्षक संघ माणगाव तालुका अध्यक्ष तसेच शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष पदी राहून कर्तव्यदक्ष काम केले अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून बौद्धजन पंचायत समिती टोळखुर्द अध्यक्ष, माणगांव बौद्धजन पंचायत समिती तालुकाध्यक्ष, तंटामुक्त समिती टोळ खुर्द अध्यक्ष, मराठा सेवा संघ माणगाव तालुका अध्यक्ष, एकता वाळू उत्खनन सहकारी संस्था, नळ पाणी पुरवठा टोळ खुर्द अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती नांदेड विभाग अध्यक्षपदी राहून जनसेवा केली आहे.
या जनसेवेतून यशपाल साळवी यशवंत व किर्तीवंत झाले आहेत अशा कर्तव्यदक्ष निर्भीड स्पष्टवक्ता एकनिष्ठपणा परोपकारी भावना जपणारे, दिलदार व्यक्तिमत्व असलेले यशपाल साळवी यांच्या षष्ठ्यब्दिपूर्ती सोहळ्याला विविध संस्थेमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवर्ग, मित्र परिवारांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सदर सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती नांदवी विभागाने केले आहे.