वरसगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सापया पॅनलचे अपक्ष उमेदवार सौ. पुनम अजित आंब्रुस्कर विजयी
मतदारांचा राष्ट्रवादीला धक्का!
धाटाव/रोहा : किरण मोरे
कोलाड विभागामधील अंत्यत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या वरसगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाला दे धक्का देत गावातील वार्ड १ मधून सर्वपक्षीय मतदारांनी सौ. पुनम अजित आंब्रुस्कर यांच्या पारड्यात एकतर्फी मतदान करुन विजयी केले.
ग्रामपंचायतीमध्ये याअगोदर सौ. पुनम अजित आंबृस्कर यांचे पती श्री अजित आंब्रुस्कर हे निवडुन वार्ड ३ मधुन आले आहेत.
मा. आमदार अनिलभाऊ तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणुन श्री. अजित आंब्रुस्कर यांची ओळख आहे.
आई-वडिलांचा आशिर्वाद, मित्रपरिवार व गावातील सर्वपक्षीय मतदारांनी केलेली मदत मला पुढील वाटचालीस काम करण्यास प्रेरित राहील. गावातील सर्वांचे मनापासुन धन्यवाद! अशी प्रतिक्रीया विजयानंतर अजित आंब्रुस्कर यांनी दिली आहे.