महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस १ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रूपये दंडाची शिक्षा
रायगड : किशोर केणी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अंकुश एकनाथ जोशी रा. कुसुंबळे याला अलिबाग येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. ए.व्ही.मोहिते यांनी भा.द.वि.कलम ३५४ व ४५६ प्रमाणे दोषी धरून १ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील ३ हजार पैकी २ हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस देण्याचा आदेश मा. न्यायालयाने केला.
फिर्यादी महिलेच्या घरामध्ये खिडकीद्वारे प्रवेश करुन कॉटवर झोपलेल्या फिर्यादीच्या अंगावर झोपून फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कुत्य करुन महिलेचा विनयभंग केला म्हणून फिर्यादी महिलेने पोयनाड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती.
तपासी अंमलदार एन. एस. पाटील यांनी तपास पुर्ण करुन अलिबग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात अभियोगपक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात अभियोगपक्षातर्फे सरकारी वकिल, श्रीमती कविता परीट यांनी काम पाहीले. सदर खटल्यात पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार जी.एस.पवार व आर. आर. नाईक यांचे सहकार्य मिळाले.