राजकीय पूर्ववैमनस्यातून हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हा दाखल
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत आरोपीने फिर्यादीला व फिर्यादीने आरोपीला राजकीय पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याची घटना १ जानेवारी रोजी ००:१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आरोपी रा. गांधेपाडा यांनी फिर्यादी रा. गांधेपाडा हे दुकानावर दूध व साखर अनण्याकरिता जात असताना झटका दिला म्हणून आरोपी यांनी मनात राग धरून शिवीगाळ, दमदाटी करून हातबुक्याने मारहाण केली. तसेच तेथे पडलेल्या लोखंडी सलईने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून दुखापत केली.
या मारहाणीत आरोपी व फिर्यादी दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाणे येथे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.