ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे भारताचा ७३ वा प्रजाकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा 

कोलाड : निलेश महाडीक 

भारताचा ७३ वा प्रजाकसत्ताक दिनानिमत्त रोहा तालुक्यातील मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब या शाळेचा खांब कोलाड देवकान्हे विभागातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब शैक्षणिक संस्थेतून सेवा निवृत्त शिक्षक तथा शैक्षणिक, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मारुती खांडेकर, त्यांच्या पत्नी सौ. मालती खांडेकर सहपत्नीक यांच्या शुभ हस्ते मोठ्या उस्ताही वातावरणात साजरा करण्यात आला.    

भारताचा ७३ वा गणतंत्र दिवस रोहा तालुक्यातील मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब या शालेचा ध्वजारोहण खांडेकर सहपत्नीक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित मार्गदर्शक हभप नारायण महाराज लोखंडे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद वाटावे, उपाध्यक्ष सुरेश भोसले, संचालक सुधीर लोखंडे, गजानन महाडिक, पत्रकार डॉ. श्याम लोखंडे, शिक्षक पालक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मरवडे, निलेश शिंदे, तेजस जाधव, दिलीप मोहिते, सचिन  गोळे, जगन्नाथ भोईर, तुकाराम कोंडे, सौ. योगिता ठाकूर, सौ. अनुपमा चितळकर, सौ. अर्चना परबळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रिया लोखंडे सह शिक्षीका सोनाली शिंदे, ऋतुजा पवार, मदतनीस संतोषी वाळंज, यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, पालक व माता भगिनी बहुसंख्येने उपस्तित होते. 

यावेळी ध्वजारोहण मानवंदना राष्ट्रगीत विश्वस्थ गीत देशासाठी ज्या हुताम्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आशा महान युग पुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आशा महान थोर पुरुष व शुर वीरांबद्दल तसेच प्रजाकसत्ताक दिनाबद्दलची माहिती विविध नृत्य व पथनाट्य, विविध वेशभूषा परिधान करत शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे, शिक्षक, पालक वर्ग समावेत इंग्रजी, हिन्दी व मराठी भाषेत याची महती यावेळी पटुन दिली तसेच  प्रमुख उपस्थित पालक रविंद्र मरवडे, यांनी देश भावना व्यक्त केली तसेच प्रमुख पाहुणे खांडेकर सर व मॅडम यांनी विद्यार्थी पालक वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गोविंद वाटवे, डॉ. श्याम लोखंडे, संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, सुधीर लोखंडे, मुख्याध्यापिका सौ. रिया लोखंडे, यांनी विद्यार्थी शिक्षक पालक वर्गा समावेत आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,  दिवसेंदिवस नव्या पिडिला नव्या युगात बदलत्या काळाचे चांगले शिक्षण शिक्षणाचे बदलते धोरण लक्षात घेत शिक्षण देण्याचे काम या खांब देवकान्हे विभागातील ग्रामीण भागात रविंद्र लोखंडे आणि सौ. रिया लोखंडे या दांम्पत्य कडून इंग्रजी शाळेत होत आहे त्याच प्रमाणे शिक्षकांसह या शालेचा विद्यार्थी आनंदित दिसत असून मुलांचे मनोधैर्य सुधारित शिक्षण आज या विभागात पहावयास मिलत आहे.

कोरोना काळात अनेक संकटात ऑनलाईन तासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम ज्ञानांकुरने केले आहे व करत असल्याची भूमिका पालकांनी यावेळी व्यक्त केली .

Popular posts from this blog