माध्यमिक शाळा शिहू येथे विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील यांच्या आदेशाने, तसेच  नागोठणे पोलीस स्टेशनंचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर  यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ जानेवारी २०२२ ह्या नवीन वर्षाचे औचित्य साधून को. ए. सो. माध्यमिक शाळा शिहू येथे विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमां विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस दूरक्षेत्र वेलशेत चे इंचार्ज प्रमोद कदम यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले की, कोणत्याही विद्यार्थ्यांने १८ वर्षावरील वाहन चालविण्याचा परवाना मिळाल्याशिवाय वाहन चालवू नये, तसेच श्यक्यतो डोक्यात हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी वाहन चालवू नये कारण आपण बघतो जास्तीत जास्त अपघातांमध्ये अल्पवयिन मुलांचा समावेश असतो. त्यामुळे असे अपघात टाळायचे असतील तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे  गरजेचे आहे. म्हणून कोणीही वाहन चालविण्याचा परवाना मिळाल्या शिवाय वाहन चालवू नका व हेल्मेट चा नियमित वापर करा असे विद्यार्थ्यांना सूचित करण्यात आले. 

यावेळी उपस्थित ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे प्रमोद कदम (पोलीस दूरक्षेत्र वेलशेत इंचार्ज) माध्यमिक शाळा शिहू  चे मुख्याध्यापक जे. जे. पाटील सर, जाधव सर, पाटील सर, उषा म्हात्रे मॅडम, जाधव मॅडम, जनार्दन शेळके, कमला ठाकूर, दळवी इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog