बोगस बिलांच्या भ्रष्ट कारभारामुळे "खादाड" अभियंत्याकडून एक ग्रामपंचायत आधीच काढून घेतलीय!
बोगस कामाच्या बिलांचा भ्रष्ट कारभार थांबणार कधी?
बोगस कामांची बिले काढणाऱ्या अभियंत्यावर राजकीय वरदहस्त?
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा तालुक्यात बोगस कामांची बिले काढणारा भ्रष्ट "खादाड" अभियंता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभियंत्याकडून यापूर्वी एका ग्रामपंचायतीचे काम आधीच काढून घेण्यात आलेय. परंतु तरीही त्याची खादाड वृत्ती अजूनही संपलेली नाही.
विकासकामांची बोगस बिले काढणाऱ्या या अभियंत्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याने आपले भ्रष्ट उद्योग राजरोसपणे सुरू ठेवले आहेत.
रोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत बोगस विकासकामे झालेली आहेत. अर्थात, विकासकामे इस्टिमेंट प्रमाणे झालेली नाहीत, तर काही ठिकाणी विकासकामे झालेली नसताना देखील ती कामे झाल्याचा कागदोपत्री देखावा निर्माण करून अशा प्रकारच्या बोगस कामांची बिले अनेक ग्रामपंचायतींना अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाचा पैसा भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
बोगस बिले काढणाऱ्या या अभियंत्याच्या विरोधात आता तक्रार दाखल होण्याच्या मार्गावर असून या तक्रारीमुळे शासनाचा पैसा भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जाणे बंद होणार आहे.