रोहा तालुक्यातील पहिल्या कबड्डी लीग चे विजेते पद श्री काळभैरव पालेखुर्द रोहा बुल्स संघाने पटकावले 

संघमालक महेशदादा ठाकूर यांच्या संघाला प्रथम क्रमांकाचे विजेतेपद 

धाटाव/रोहा : किरण मोरे 

जय बजरंग क्रिडा मंडळातर्फे रोहा येथील म्हाडा मैदानावर जय बजरंग रोहा कबड्डी लीग २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी लीगमध्ये एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे सहकार्य लाभले.

त्यामध्ये प्रथम क्रमांक श्री काळभैरव पालेखुर्द रोहा बुल्स, द्वितीय क्रमांक काळभैरव वरसे - रोहा, तृतीय क्रमांक श्रेया स्पोर्ट्स रोहा स्टार, चतुर्थ क्रमांक तारांगणी रोहा वॉरीयर्स यांनी पटकावला. यामधील विजेत्या संघांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व चषक देण्यात आले. बक्षीस वितरण रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री विजय मोरे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले. 

प्रथम क्रमांक विजेत्या संघाचे संघमालक महेशदादा ठाकूर, मुख्य कोच संदेश बामणे, संघ व्यवस्थापक रूपेश रटाटे, फिटनेस कोच मयुर मोंडे तसेच सर्व विजेत्या संघांवर व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog