सुधागडात काळे धंदे पुन्हा सुरु, पोलीस प्रशासनाची डोळेझाक! 

प्रतिनिधी : समीर बामुगडे

रायगड जिल्हात सुधागड तालुका हा आता अवैध प्रकारांबाबत अतिसंवेदनशीलतेकडे झुकताना दिसत आहे. चोरीच्या घटना, लुटालूट, खुन व विनयभंग ते बलात्कार अशा विविध गुन्ह्यांनी हा तालुका त्रस्त झालेला आहे. स्थानिक पोलीस व जिल्हा पोलीस प्रशासन कुणाचे अपयश म्हणायचे? कुणीही उठावे काहीही करावे अशी भीषण परिस्थिती ग्रामस्थ व नागरिक अनुभवतात असे दिसुन येते आहे. 

वाळु माफिया, माती माफिया यानंतर कॉरी माफियाचा तसेच मटका चक्री जुगाराचा धुडगुस सुरु आहे. विविध ठिकाणच्या डोंगरदऱ्यातील सुरुंग स्फोटाचे आवाज सुधागड तालुक्यात उमटत आहेत आणि नेमके हे आवाज प्रशासनातील संबंधित खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत का पोहचत नाहीत? की यांनी जाणून बुजुन कानावर हात ठेवले आहेत? याचा विचार शासनाने केला पाहिजे मोठे-मोठे डोंगर भुईसपाट केले जात आहेत. मातीचे अवैध उत्खनन सुरु आहे. अजुनही वाळुचा उपसा कुठे ना कुठे सुरु आहे. नदी पात्रात कुठलीही परवानगी न घेता टँकर मालक पाण्याचा अवैध उपसा करत आहेत. अशा परिस्थतीत जिल्ह्यात बंद व थंड पडलेले मटका जुगार पुन्हा सुरु झाले आहेत. 

सुधागड मध्ये चक्री जुगार तेजीत चालु असताना या कारवाई कडे सुधागड पोलीस निरीक्षक दुलँक्ष करताना दिसुन येत आहेत. पाली मध्ये शिवसेना शाखा गल्ली भागात मटका व तसेच रायगड बाजार जवळ खेळ सुरु आहे आणि सिध्दीविनायक काँप्लेक्स या ठिकाणी सुध्दा चक्री खेळ सुरु आहे. सुधागड तालुक्यात चालणारे अवैध धंदे बंद करण्याची मागणी हळूहळू जोर धरत आहे.

Popular posts from this blog