तळा तालुक्यात गुटखा बंदीचा उडाला फज्जा!
बंदी असुनही होतेय सर्रास विक्री, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
तळा : संजय रिकामे
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे मात्र तरीही तळा तालुक्यात कानाकोपरयात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरु आहे. तालुक्यात अनेक दुकानदारांनी केवळ वरकमाईसाठी गुटखा पाकीटे अवैध मार्गाने खरेदी विक्री सुरु ठेवल्याने या गुटखा बंदीचा तळा तालुक्यात अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक पोलीसांच्या वरदहस्ताने फज्जा उडाला आहे. वृत्तपत्रात गुटखा विक्री बाबत अनेक वेळा वृत्त येऊन सुध्दा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे या अवैध गुटखा विक्रीतुन रोज लाखो रुपयांची ऊलाढाल होत आहे शासनाने गुटखा बंदीचा कायदा केला मात्र या बंदीमुळे सध्या गुटखा तीप्पट किंमत घेवुन विकला जात आहे. स्थानिक दुकानदार गुटखा कागदात गुंडाळून विक्री करतात गुटखा विक्री करणारे तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर सक्रीय झाले असुन यावर कारवाई होणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गुटखा खाणारयांना गुटखा विक्रीची दुकाने सापडतात मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारयांना त्याचा पत्ता का लागत नाही हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुटखा चोरट्या मार्गाने आयात होतो आणि तो खुलेआम विकला जातो.
काही वर्षा पुर्वी महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदी लागु केली होती त्यानंतर अनेक ठिकाणी छापे मारुन अन्न व औषध प्रशासन आणि पोलीसांनी लाखोंच्या किंमतीचा गुटखा हस्तगत केला होता मात्र ही गुटखा बंदी लागु झाल्यापासुन काळ्या बाजाराने गुटखा सर्वत्र मिळत आहे. गुटख्याला पर्याय म्हणुन आता विविध कंपन्यांनी पान मसाले बाजारात आणले असुन या पान मसाल्यांबरोबर एक छोटी तंबाखुची पुडी मिळते. या दोन पुड्या एकत्र करुन खाल्ल्यास गुटख्या सारखी चव लागते ज्यावेळी गुटखा खुलेआम मिळत होता तेव्हा अनेक शाळकरी मुले महीला वर्ग गुटखा खाऊ लागले होते मात्र शासनाने गुटखा बंदी केल्यापासुन हे प्रमाण कमी झाले असले तरी शासनाला पुर्णपणे गुटखा बंदी करता आलेली नाही अजुनही अनेक ठिकाणी विविध प्रकारचा गुटखा विक्री होत आहे.