रोहे-अष्टमीकराणा पाण्यासाठी वणवण करायला लावणाऱ्यांवर कारवाई करा 

रोहा शहर मनसेचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाटाव/रोहा : किरण मोरे 

रोहे अष्टमी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गेल्या आठडाभरापासून रोहे शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या समस्येमुळे समस्त रोहे अष्टमी शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत.

दरवर्षी नित्यनियमाने पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांवर ही वेळ रोहा न. पा. मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळेच आली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. अशा या बिनकामी अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागांतर्गत केलेल्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी रोहे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोहे तहसीलदार यांच्या वतीने जिल्हाधिकारी रायगड यांना लेखी निवेदन देत केली. 

दि. २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहा शहराध्यक्ष श्री. मंगेश रावकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन रोहे तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. राजेश थोरे यांना देण्यात आले.

Popular posts from this blog