माणगांव नगरपंचायत निवडणुकीकरिता उमेदवार प्रशांत साबळे व ज्ञानदेव पवार यांचा प्रचार दौरा

माणगाव : उत्तम तांबे

लोकनेते, माजी आमदार अशोक गणपत साबळे यांचे सुपुत्र, शिवसेना नेते राजिव साबळे यांचे बंधू  प्रशांत अशोक साबळे यांनी माणगांव नगरपंचायत निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक १५,  तर माजी रा.जि.प. शिक्षण सभापती काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पवार यांनी प्रभाग क्रमांक १६  करिता मंगळवार दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या  प्रभागांमध्ये जोरदार प्रचार दौरा सुरू केला आहे.

प्रभाग क्रमांक १५ मधील उमेदवार प्रशांत साबळे यांना धनुष्यबाण निशाणी तसेच प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवार ज्ञानदेव पवार यांना हाताचा पंजा निशाणी मिळाली असून निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर तसेच माणगांव विकास आघाडीचे पॅनल निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदान राजांची भेट घेण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार दौरा सुरू करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक १५ मधील प्रशांत साबळे व प्रभाग क्रमांक १६ मधील ज्ञानदेव पवार यांनी मतदार बांधू-भगिनींची भेट घेतल्यानंतर या कर्तव्यदक्ष उमेदवारांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे . त्याचबरोबर मतदारांनी मनपूर्वक भरभरून आशिर्वादही दिला.

माणगांवच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दादांचे महान विचार प्रेरित करून, त्यांचा आशीर्वाद घेऊन, त्यांचे प्रभावशाली स्वप्न साकार करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करीत आहोत. "असेन मी, नसेन मी, कार्य कर्तृत्वातून दिसेन मी' या दादांच्या उक्तीप्रमाणे आमचे जनसेवेचे कार्य चालू राहील. आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे. या यशाच्या माध्यमातून माणगांवचे नवे वैभव साकार करू. असा ध्येयरुपी आत्मविश्वास माणगांव शिवसेना प्रमुख युवानेते राजिव साबळे यांनी या प्रचारदौरा निमित्त प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. यादरम्यान दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी पंचायत समिती सदस्य स्वप्नज्या गायकवाड, माजी ग्रामपंचायत सरपंच सुखदा धुमाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य काशिराम पवार, माजी ग्रामपंचायत उपसरपंच अरुण पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर कनोजे, युवा नेते सुरेश (बाळा) पवार, ज्येष्ठ समाजसेवक महादेव (अण्णा) कनोजे, चेतन गायकवाड, प्रसाद शिंदे, वीरेश येरुणकर, धुमाळ मामा, औदुंबर गायकवाड, अभिजीत घर्वे, वैभव पवार, समीर पवार, उर्मिला साबळे, खांदाड महिला मंडळ अध्यक्ष पुष्पा दसवते, स्मिता जाधव, वर्षा कोलीस्ते, मीना पवार, अदिंसह अनेक कार्यकर्ते या प्रचार दौऱ्यात उपस्थित होते. 

Popular posts from this blog