रवीभाऊ मुंढे यांच्या उपस्थितीत तळ्यामध्ये भाजपाची प्रचार रॅली
तळा : संजय रिकामे
तळा नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले या प्रचार फेरीत भाजपा उमेदवारांना तळा शहरात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणार असा विश्वास रविभाऊ मुंढे यांनी व्यक्त केला. या प्रचार रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव राविभाऊ मुंढे, नगरपंचायत माजी नगराध्यक्ष सौ.रेश्मा मुंढे, तालुका अध्यक्ष ॲड. निलेश रातवडकर, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, सरचिटणीस रमेश लोखंडे, युवा शहर अध्यक्ष सुयोग बारटक्के, गिरणे सरपंच ज्योती पायगुडे, महिला शहर अध्यक्ष अमृता टिळक,मंगेश सावंत,विलास ठसाळ, सुरेश शिंदे, रितेश मुंढे, भैरव मेहता प्रभागातील सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसला. रॅलीतील कार्यकर्त्यांनी जय श्रीराम आणि भारत माता की जय या घोषणेने परीसर दणाणून सोडला उमेदवाराच्या प्रचारासाठी घरोघरी पत्रक वाटून भाजपा उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा असे आवाहन कार्यकर्त्यांनी मतदारांना केले.भारतीय जनता पार्टी कडून प्रभाग क्रमांक २ मध्ये सुबोध लक्ष्मण भौड, प्रभाग क्रमांक ५ मध्ये दिव्या निलेश रातवडकर, प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुधीर काशिराम तळकर, प्रभाग क्रमांक १६ मध्ये सुरेखा नामदेव पवार हे उमेदवार कमळ या चिन्हावर उमेदवारी लढवत आहेत. या सर्व प्रभागात भाजपाचे उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश सचिव रवीभाऊ यांनी व्यक्त केला आहे.