रोहा येथे ४ ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगार, पोलीसांचे दुर्लक्ष!

रोहा येथील चक्री जुगार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

धाटाव/रोहा : किरण मोरे

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगार तेजीत सुरू असून पोलीसांना हफ्ता पोहोचत असल्यामुळे येथील चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. 

रोहा शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून या ऑनलाईन जुगाराच्या नादाने अनेक जुगारवेड्या तरूणांनी घरातील महिलांचे दागिने विकल्याचे धक्कादायक प्रकार देखील यापूर्वी घडलेले असून काही ठिकाणी घातपाताच्या घटना देखील घडलेल्या आहेत. सदरचे ऑनलाईन चक्री जुगारचे धंदे या परिसरात धुमधडाक्यात सुरू असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हा चक्री जुगार बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.


Popular posts from this blog