मोरबा जि. प. मतदार संघातील विविध विकासकामांचे ४ डिसेंबर रोजी आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते होणार भूमिपूजन


माणगांव : प्रतिनिधी 

माणगांव तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा मोरबा जिल्हा परिषद मतदार संघ, विस्तार आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील हा जि.प. मतदार संघ विस्तीर्ण आहे व माणगांव तालुक्यातील बराचसा ग्रामीण भाग या जि. प. मतदार संघात समाविष्ट आहे. बरेच वर्षांपासून आणि कोरोना संकटामुळे या मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली विकासकामे शेकाप सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील, मा. आमदार पंडितशेठ पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मोरबा जि. प. मतदार संघाच्या कार्यक्षम जि. प. सदस्या आरतीताई मोरे, माणगांव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत आहेत. या विकासकामांच्या आलेल्या प्रशासकीय मान्यता देखील संदर्भित ग्रामस्थांना मागील काही दिवसांपूर्वी जि. प. सदस्य आरतीताई मोरे व तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

या विकासकामांची भूमिपूजने येत्या ४ डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या शेकाप आमदार तथा सरचिटणीस जयंतभाई पाटील, मा. आमदार पंडितशेठ पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, माजी जि. प. अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, माजी जि. प. सदस्य अस्लमभाई राऊत, जि. प. सदस्या आरतीताई मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. 

एकूण ११ विकासकामांची भूमिपूजनांचा यामध्ये समावेश आहे त्यामध्ये, निवाची नळेफोडी येथील रस्ता डांबरीकरण करणे,चांदोरे येथील कुणबी समाज सभागृह दुरुस्ती,पळसप येथील रस्त्याचे कार्पेट करणे, डोंगरोली वरचीवाडी येथील रस्ता डांबरीकरण करणे, मोरबा येथे संरक्षक भिंत बांधणे, मोरबा राऊत मोहल्ला येथील रस्ता डांबरीकरण करणे, मोरबा येथे सामाजिक सभागृह बांधणे, मोरबा मराठा आळी सामाजिक सभागृह बांधणे, राजीवली येथे सामाजिक सभागृह बांधणे, राजीवली येथील रस्ता डांबरीकरण करणे, उमरोली खरवली नळपाणी योजना या विकासकामांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाकरिता माणगांव तालुक्यातील व मोरबा जि. प. मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व प्रकोष्ठ सेल चे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली चे पालन करून ४ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन जि. प. सदस्या आरतीताई मोरे, माणगांव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे व माणगांव तालुका शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आले आहे.

Popular posts from this blog