नागोठणे ग्रामपंचायत निवडणुक : प्रभाग क्रमांक ५ चे विजयाचे शिलेदार दिलीप उर्फ भाई टके
नागोठणे : राज वैशंपायन
प्रभाग क्रमांक ५ च्या निवडणुकीच्या वेळेत रात्र दिवस अतिशय मेहनत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विभागीय नेते श्री दिलीप उर्फ भाई टके यांनी घेऊन नागोठणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश पिंपळे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत विशेष मेहनत घेतली व शिवसेनेचे कै. शैलेंद्र देशपांडे यांनी राखून ठेवलेले अनेक वर्षाचे प्रभाग क्रमांक पाच चा गड हा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पिंपळे यांना ४७ मतानी पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवून दिली या पोटनिवडणुकीमध्ये आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील उमेदवारांसाठी प्रचार रॅली काढल्याने मतदारांवर एक वेगळाच त्याचा प्रभाव पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले व हा विजय राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याचे काम सोपे झाले.
प्रभाग क्रमांक ५ च्या अतीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीशी सरशी साठी भाई टके यांचे मोलाचे योगदान लाभल्यामुळे कित्येक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक पाचच्या निवडणुकीमध्ये एक वेगळीच रंगत नागोठणे मध्ये पहावयास मिळाली या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार राजेश पिंपळे ४७ मतांनी निवडून आले इतकी मोठी व कसरतीची रंगत होती की दोन्ही पक्षांनी ही निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधला होता. या निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे विभागीय नेते दिलीप उर्फ भाई टके यांनी विशेष मेहनत घेतली दिलीप भाई यांनी आपले मतदार बरोबर असलेले संबंध व हितसंबंध तसेच आपली असलेली राजकीय प्रतिष्ठा त्यांनी पणाला लावून सदर उमेदवार हे निर्विवादपणे निवडून आणले प्रभाग क्रमांक पाच हा गड म्हणजेच शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि त्या गडाला बुरुज लावणी एवढे सोपे नव्हते मात्र भाई टके व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विशेष मेहनतीमुळे गेला शक्य झाले विभागीय नेते दिलीपभाई टके यांच्याकडे अनेक वर्षांपासून असलेला राजकीय अनुभव आणि चाणक्य निती यामुळे ते शक्य झाले आहे. माजी सरपंच विलास चौलकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब टके विभाग उपाध्यक्ष युवक दिनेश घाग सर्वांनी विशेष मेहनत घेतल्याचं दिसले. रोहा तहसीलदार कार्यालयामध्ये निवडणुकीचे निकाल लागताच निवडणूक जिंकल्यानंतर राजेश पिंपळे यांची मिरवणूक नागोठणे येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उमेदवार विजयी मिरवणूक काढण्यात आली आणि जोगेश्वरी माता मंदिराच्या पटांगणामध्ये मिरवणुकीची सांगता झाली. या विजयी उमेदवार मिरवणुकीत बाळासाहेब टके, विनायक गोळे चंद्रकांत गायकवाड विभाग अध्यक्ष संतोष कोळी सुनील लाड, दिनेश घाग, युवक विभाग उपाध्यक्ष माजी सरपंच प्रकाश जैन, जनार्दन सपकाळ, दिलीप पप्पू अधिकारी, तात्या खंडागळे, सिद्धेश काळे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, श्रीपाल जैन, चेतन टक्के, मनोज टक्के, पंकज टक्के, अर्चना पिंपळे, निशांत सय्यद, आसिफ अधिकारी, सचिन ठोंबरे, दिनेश ठोंबरे, अभिजीत ठोंबरे, संजय सांगळे, ज्ञानेश्वर सकपाळ, धर्मेंद्र शर्मा, सौ. प्रतिभा तेरडे, अंकित ठोंबरे आदींसह राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते या विजयी मिरवणुकीमध्ये उपस्थित होते.