तळा : संजय रिकामे
भानंग ग्रामपंचायत पोटनिवणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण महिला या जागेसाठी सुप्रिया पागार यांनी अर्ज भरला होता. त्याचप्रमाणे याच प्रभागातून अनुसूचित जाती महिला या जागेसाठी सुवर्णा पवार यांनी अर्ज भरला होता तर प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण जागेवरून लक्ष्मण चोरगे यांनी अर्ज भरला आहे. या तीन जागेसाठी दि. 7 डिसेंबर रोजी छाननी घेण्यात आली. या छाननीमध्ये सुप्रिया पगार आणि लक्ष्मण चोरगे यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. सुवर्णा पवार यांचा उमेदवारी अर्ज जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने बाद करण्यात आला आहे. या जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही जागा आता रिक्त ठेवण्यात येणार आहे.
गाव पातळीवर असणारे सर्व मतभेद, गट तट, राजकीय द्वेष, बाजूला सारून गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे मत भानंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य नाना दळवी यांनी ग्रमस्थांसमोर मांडले. निवडणुकीत होणारा अनावश्यक खर्च व प्रशासनावर पडणारा ताण कमी होईल, असेही नाना दळवी यांनी सांगितले. नाना दळवी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भानंग आणि भानंगकोंड गावकऱ्यांनी एकत्रित येऊन आपली ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले. या माध्यमातून गट, तट, भावबंधकी व राजकीय द्वेष व सामाजिक तेढ निर्माण झाला नाही.