रोहा तालुक्यातील "खादाड" अभियंता कारवाईच्या रडारवर! 

बोगस कामांची बिले काढणाऱ्या अभियंत्यावर राजकीय वरदहस्त?

धाटाव/रोहा : किरण मोरे 

रोहा तालुक्यातील भ्रष्ट "खादाड" अभियंता हा त्याच्या उपद्व्यापांमुळे सध्या सर्वत्र चर्चेत असून विकासकामांची बोगस बिले काढण्यात हा पटाईत आहे. या भ्रष्ट आणि खादाड अभियंत्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याने आपले भ्रष्ट उद्योग राजरोसपणे सुरू ठेवले आहेत.

रोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत बोगस विकासकामे झालेली आहेत. अर्थात, विकासकामे इस्टिमेंट प्रमाणे झालेली नाहीत, तर काही ठिकाणी विकासकामे झालेली नसताना देखील ती कामे "उत्कृष्ठ प्रकारची" झाली असा फक्त कागदोपत्री देखावा निर्माण करून अशा प्रकारच्या बोगस कामांची बिले अनेक ग्रामपंचायतींना अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाचा पैसा भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही बोगस बिले काढून देण्याचे काम हा खादाड अभियंता करीत असून या भ्रष्ट अभियंत्याविरूद्ध तक्रार करण्यासाठी आता काही तक्रारदार पुढे आले असल्यामुळे या भ्रष्ट अभियंत्याच्या गळ्याभोवती आता कारवाईचा फास आवळला जाणार हे निश्चीत झालेले आहे. पण ह्या भ्रष्ट खादाड अभियंत्यावर कारवाई झाल्यास भ्रष्टाचारी राजकीय पुढाऱ्यांची मोठी गैरसोय होणार, यामध्ये शंकाच नाही!

Popular posts from this blog