मतदारांच्या भेटीगाठी प्रचारात शिवसेना अव्वल
तळा : संजय रिकामे
तळा नगरपंचायतीची निवडणूक मोठ्या अटीतटीची होणार असून सर्वच राजकीय पक्ष १७ प्रभागातून मतदारांच्या भेटीगाठीला प्रत्येक घरा घरात जावून मतांची झोळी पुढे करीत आहेत. या प्रचारात शिवसेनेकडून प्रचाराचे नियोजन अचूक केले असून सोशल मिडीयासह प्रत्यक्ष मतदार भेटीवर जास्त भर दिला जात आहे सर्वच प्रभागात शिवसेना उमेदवाराकडून प्रचाराच्या सात ते आठ फेऱ्या झाल्या आहेत.शिवसेना सर्व ताकदीने बहुमताने विजयी होण्यासाठी सज्ज झाली आहे.
शिवसेनेने प्रत्येक मतदारांपर्यत पोहोचण्यात अव्वल स्थानी आहे. प्रत्येक प्रभागातून उत्तम प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षात विकास कामात घेतलेली भरारी अंतर्गत रस्ते,भूमीगत गटारे,वाढत्या लोकसंख्या वाढीचा विचार करता नियोजीत वाढीव पाणी योजना वावे धरणाचे लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. अशी विविध विकास कामे शिवसेनेकडून करण्यात आली आहेत. शिवसेनेने निवडणुकी करता वचननामा प्रसिद्ध केला आहे या वचनाम्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा विकास निधीचा तपशील उपलबध करून दिला असल्याचा लेखाजोखा मांडला आहे.विकासकामे केली असल्याने सत्ताधारी शिवसेना पक्षाची जमेची बाजू आहे. त्यामुळे मतदारां कडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे शहर प्रमुख राकेश वडके यांनी सांगितले. जनतेच्या मनातील विकास करण्याचा आपला मानस आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यावर भर दिला जाईल असे सांगितले. शिवसेनेच्या सर्व जागा विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ. भरतशेठ गोगावले माजी आ. अवधूत तटकरे यांनी शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारात सहभागी झाले भरतशेठ गोगावले यांनी तळा शहरातील विकासकामे करण्यासाठी खूप सहकार्य लाभले त्यांच्याच प्रयत्नांनी तळा शहरासाठी तब्बल ९ कोटी रुपये खर्चून पाणी योजना राबविण्यात येणार आहे. माजी आ. अवधूत तटकरे यांनी तळा नगरपंचायत निवडणूक प्रचारात उडी घेतल्याने तटकरे विरुद्ध तटकरे असा सामना रंगताना पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची सुमार कामगिरी यामुळे खासदार पालकमंत्री आणि आमदार यांना तळ्यात तळ ठोकून रहावे लागत आहे हे सर्वसामान्य जनतेला कळले असून जनता शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी आहे असा विश्वास तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी व्यक्त केला आहे.