कोलाड येथे मटका माफीयांचा धुमाकूळ! 

कोलाडचे पोलीस अधिकारी सुभाष जाधव मटका माफीयांना ठोकतात सलाम?

कोलाड परिसरात कायदा सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर!

ॲड. काशिनाथ ठाकूर यांच्याकडून कारवाईची मागणी 

धाटाव/रोहा : किरण मोरे

रोहा तालुक्यातील कोलाड येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून पोलीसांना येथील मटका माफीया हे पोलीसांचे आधारस्तंभ बनल्यामुळे या अवैध मटका जुगारावर पोलीस कारवाई करीत नसल्याची धक्कादायक माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी दिली.

येथील अवैध मटका जुगाराचे धंदे पाहता कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आल्याचे स्पष्ट होत चालले आहे. कोलाडचे पोलीस सुधरणार कधी? असा प्रश्न ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

येथे मटका जुगार जोमात सुरू असल्यामुळे पोलीसांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. येथील बेकायदा मटका जुगारामुळे पोलीसांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे चर्चिले जात असून मटका माफीयांकडून पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्याचे ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी उघडकीस आणलेले आहे.

Popular posts from this blog