कोलाड : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवाशी अंकुश विठ्ठल जाधव यांचे रविवार दि.२६ डिसेंबर २०२१रोजी अल्पशा आजाराने निधन मृत्यू समयी त्यांचे वय ५९ वर्षाचे होते. त्यांना सर्वजण नाना या नावाने हाक मातर असते. त्यांचा राहणीमान साधा होता. परंतु सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग होता.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ, भावजया, पुतणे, नातवंडे व मोठा जाधव परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि.४ जानेवारी तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि. ७ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या गोवे येथील निवास्थानी होणार आहेत.