रस्ता चुकलेल्या वयोवृद्ध इसमाला सुखरूप घरी पोहोचविले!
वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार नरेश मोरे यांची कौतुकास्पद कामगिरी
लोणेरे : प्रतिनिधी
रस्ता चुकलेल्या वयोवृद्ध इसमाला सुखरूप घरी पोहचविण्याची कौतुकास्पद कामगिरी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार नरेश मोरे यांनी केली आहे.
गोरेगाव (पूर्व) मुंबई येथील श्रीकांत अच्युत कुरळकर (वय 85) हे देवगड-लांजा, जि. रत्नागिरी येथून मुंबई मुंबईच्या दिशेने रेल्वेने प्रवास करीत असताना सायंकाळी त्यांना गोरेगाव रेल्वे स्टेशन दिसले म्हणून त्यांनी बाजूला बसलेले ईसमास गोरेगाव मागे गेले का? असे विचारून ते माणगांव येथी रेल्वे स्टेशनला उतरले. तेथून ते लोणेरे येथे आले व तिथे आल्यानंतर त्यांना समजले की आपण चुकीच्या जागी उतरलो. त्यावेळी ते पूर्ण घाबरले होते. त्यांना काय करावे, काय नाही हे सुचत नव्हते! तेव्हा कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार नरेश मोरे यांनी प्रसंगावधान राखून त्यांची मुलगी हिमगौरी हिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर महाड बोरीवली एसटी बस मध्ये बसवून एसटी कंडक्टर व चालक यांना समजावून सांगून यांच्या मुलीचा संपर्क करून त्यांना रात्री १:०० वाजता सुखरूप घरी पोहचविले. सहाय्यक फौजदार नरेश मोरे यांनी माणूसकीच्या दृष्टीने केलेल्या या कामगिरीबद्दल सदर वृद्ध इसमाच्या कुटूंबियांनी सहाय्यक फौजदार नरेश मोरे यांचे आभार मानले.