कोलाडमध्ये मटका आणि ऑनलाईन चक्री जुगार पुन्हा सुरू!
कोलाडच्या पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता!
येथील पोलीस अधिकारी म्हणजे "शेतातले बुजगावणे?"
ॲड. काशिनाथ ठाकूर यांची पुन्हा गृहमंत्री व पोलीस महासंचालकांकडे तक्रार
रायगड : किशोर केणी
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाडचे पोलीस म्हणजे "शेतातले बुजगावणे?" असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही! कारण शेतामध्ये जसा "बुजगावणा" हा निर्जीव आणि स्थिर असतो तशीच अवस्था कोलाडच्या पोलीसांची झालेली आहे. या परिसरात अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातलेला असताना देखील येथील पोलीस "बुजगावण्या"प्रमाणेच निर्जीव झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अवैध धंद्यांना पाठबळ देणारे कोलाडचे पोलीस अधिकारी ह्या जन्मात तरी सुधरतील का? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
कोलाडच्या पोलीसांना भीक लागली असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या पगारातून यांना स्वतःचे कुटूंब पोसता येत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांकडून हफ्ते घेऊन स्वतःच्या कुटूंबाची उदरनिर्वाह करण्याची नामुश्की येथील पोलीसांवर आल्याचे चर्चिले जात आहे.
रोहा तालुक्यातील कोलाड नाका येथे सध्या बेकायदा मटका-जुगार एकूण ३ ठिकाणी सुरू असून एका ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगार तेजीत सुरू असून अनेक तरूण व वयोवृद्ध या मटका जुगाराच्या आहारी गोल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कोलाड नाका येथील मटका जुगाराचे धंदे बंद करण्याची कारवाई करावी, तसेज, जर इथे पुन्हा मटका-जुगार यांसारखे बेकायदा धंदे सुरू दिसले तर कोलाड पोलीस स्टेशनचे नाव बदलून "बुजगावणे पोलीस स्टेशन" असे नाव ठेवावे व या नामकरमाचा शुभारंभ कोलाडचे प्रभारी पोलीस अधिकारी सुभाष जाधव यांच्या हस्ते करावा... कारण येथील पोलीस त्याच लायकीचे आहेत! अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.