माणगांव येथे ५० बेडचे सुसज्ज अल्फा हॉस्पिटल सुरू
साई/माणगांव : हरेश मोरे
माणगांव शहरात मोर्बा रोड लगत ५० बेडचे सुसज्ज अल्फा हॉस्पिटल उभारण्यात आले असून सर्वसामान्य रुग्णांसाठी सर्व वैद्यकिय सेवा या हॉस्पिटलमध्ये मिळत आहेत. रुग्णांवर अल्प दरात उपचार केले जात असल्याने हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून सदरचे अल्फा हॉस्पिटल हे मालक डॉ. ईस्माईल रहाटविलकर व डॉ. तझीन इस्माईल रहाटविलकर यांच्या मालकीचे असून ते रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा देत असतात.
या हॉस्पिटलमध्ये हार्ट, डायबिटीज़, नेत्र तज्ञ डॉ. देवेंद्र जाधव यांच्याद्वारे डोळ्यांतील मोतिबिंदु शस्त्रक्रिया तसेच नेफरोलॉजिस्ट तज्ञ डॉ. वैभव धारक यांच्याद्वारे डायलेसिस अल्प दरात उपचार करून मिळत आहे.
या हॉस्पिटलला डेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटर म्हणून शासनाकडून मान्यता मिळाली आहे. तसेच डायलेसिस सेंटर सुरु आहे. सुपर स्पेशालिटी, इन्शुरन्स फॅसिलीटी महात्मा फुले योजना लवकर सुरु होणार आहे. अनेक आजारांवर उपचार केले जात असल्याने रुग्ण समाधान व्यक्त करत असतात. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी लिफ्टची सुविधा आहे. डॉ. ईस्माइल रहाटविलकर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर यांनी दोन वर्षांच्या कोविड काळात रुग्णांवर योग्य ते उपचार करुन अनेक रूग्णांचे प्राण वाचवले त्याकरिता त्याना विविध संघटने कडून कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले. अल्फा हॉस्पिटलमधे अनेक गरीब कुटुंबातील रुग्णांवर कित्येक वेळा मोफत उपचार केले जातात. या हॉस्पिटलमध्ये लवकरच हृदय रोगावर शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार असून मुंबई-पुणे यांसारख्या शहरात जाणे रुग्णांना परवडनारे नसते, त्याकरिता माणगांव याठिकाणी हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ. ईस्माइल रहाटविलकर यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले. तसेच तिसरी लाटेचा धोका जाणवत असल्यामुळे ऑक्सिजन कमी पडू नये याकरिता योग्य व्यवस्था अल्फा हॉस्पिटल मध्ये कोविड रुग्णांसाठी आहे.