शिक्षण सम्राट किशोर जैन यांच्या हस्ते राज वैशंपायन यांना बी.एम.एम. पदवी प्रदान
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
नागोठणे येथील महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा "माझा रायगड लाईव्ह" चे संपादक राज वैशंपायन यांना शिक्षण सम्राट किशोर जैन यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठाची पत्रकारिता क्षेत्रातील मानाची अशी B.M.M. बॅचलर ऑफ मास मीडिया ही पदवी प्रदान करण्यात आली. राज वैशंपायन यांनी अल्पावधीतच आपल्या पत्रकारितेचा ठसा नागोठणे विभागात चांगल्या प्रकारे उमटविला आहे. आपल्या धारदार लेखणीतून त्यांनी कित्येकदा अन्यायाल वाचा फोडली आहे. विविध आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन गोरगरीबांना न्याय मिळवून दिला आहे. आजवर त्यांनी मोठमोठया दैनिकांमध्ये वृत्तलेखनाचे उत्कृष्ठ कार्य केलेले आहे. "माझा रायगड लाईव्ह" या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ते विवीध प्रश्नांना वाचा फोडत असून सर्वसामान्य जनतेसाठी हक्काने भांडताना दिसत आहेत. या पदवी प्रदान कार्यक्रमासाठी युवा नेते कार्तिक जैन, पत्रकार मंजुळा म्हात्रे, सुभाष म्हात्रे यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना किशोर जैन म्हणाले की, राज वैशंपायन यांच्यासारखा पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तिमत्व आम्हा नागोठणे वासियांना लाभला हेच खरं आमचं भाग्य! निर्भीड पत्रकारिता व स्टेज एक ची पत्रकारिता ही राज वैशंपायन यांच्या कडे पाहिल्यावर कळतेअसे गौरवोदगार यावेळी किशोर जैन यांनी वेक्त केले. कृतज्ञेतापर मनोगतात राज वैशंपायन म्हणाले की, ग्रामीण भागातून काम करत असताना नागरिकांच्या समस्या, नागरिकांचा सहवास व मार्गदर्शन मला काम करत असताना मोलाचे ठरले. ग्रामीण भागातील पत्रकारिता आणि शहरी भागातील पत्रकारिता यांमधील जमीन असमानाचा फरक काम करताना जाणवला. नुसती पत्रकारिता करत राहण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पदवी संपादन कर असा मोलाचा सल्ला शिक्षण सम्राट किशोर भाई जैन यांनी मला दिला होता आणि त्या विश्वासला सार्थक ठरवत अथक परिश्रम व मेहनत करून पत्रकारिता क्षेत्रातील मुंबई विद्यापिठाची मानाची अशी (बी.एम.एम.) पदवी मी संपादित केली असून मला या गोष्टीचा सार्थ अभिमान असल्याचे राज वैशंपायन यांनी आपल्या भाषणातून सांगितले.