स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या दिनदर्शिकेचे सुतारवाडी येथे प्रकाशन
कोलाड : प्रतिनिधी
स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या वतीने सुतारवाडी येथील गीताबाग येथे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री. मारुती राऊत, श्री. गोरखनाथ कुर्ले, श्री. अविनाश म्हात्रे, श्री. अशोक कदम, श्री. उदय राजपुरकर श्री. प्रवीण गांधी, श्री. शांताराम महाडिक, श्री. मोहन दोशी, श्री. खांडेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.