इंडियन प्रेस क्लबच्या उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांची निवड महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची निवड देखील जाहिर ; पत्रकार दिनी होणार गौरव
सांगली : विशेष प्रतिनिधी
मिरज येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री शाहजहाँन अत्तार यांनी उपाध्यक्ष पदावर रायगड व नवी मुंबईतुन पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांच्या नियुक्तीची घोषणा केली. किरण बाथम गेली 35 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात धाडसी व निर्भीड पत्रकार म्हणून सर्वदूर परिचित आहेत. जिल्हा तसेच राज्यस्तरीय असंख्य पुरस्कारांची त्यांच्या नावे नोंद आहे. आज महाराष्ट्रातील विविध भागातील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र कार्यकारिणी तसेच निवड झालेल्या सर्व पत्रकारांना ६ जानेवारी पत्रकार दिनी निवड पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्षपदी राजू पोतदार पुणे,सदस्यपदी प्राजक्ता किणे रत्नागिरी, रामचंद्र पोरे मुंबई, जगदीश राजे वासिम ए. बी. गायकवाड पुणे, दिलीप माने परभणी, सादिक खाटीक आटपाडी, गणेश कुंबळे मुंबई, प्रदेश सचिवपदी शाहिदभाई खेरटकर चिपळूण, शामभाऊ जांभोळीकर मुंबई, प्रसाद कुलकर्णी सोलापूर, जनरल सेक्रेटरीपदी भारत मगर अकलूज, प्रदेश सदस्यपदी मकरंद भागवत चिपळूण, हनुमंत देसाई नांदेड, भारत कवीराज मुंबई, साबिया शेख ठाणे यांची निवड जाहीर करण्यात आली. तर पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी सादीक शेख, कोकण विभाग अध्यक्षपदी बाबासाहेब ढोल्ये रत्नागिरी, उपाध्यक्षपदी रमजान गोलंदाज, सरचिटणीसपदी श्री प्रविण कोलापटे रायगड, खजिनदारपदी रविंद्र तथा बाळू कोकाटे सावर्डे, सदस्यपदी श्री शरद पोरे राजापूर यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राजेश जाधव, रायगड जिल्हाध्यक्षपदी श्री राजेश बाष्टे, सिंधुदुर्ग जिल्हापदी विजय सावंत, पनवेल अध्यक्षपदी बाळकृष्ण कासार, कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विनोद नाझरे, सांगली जिल्हाध्यक्षपदी शब्बीर मुजावर, मुंबई विभाग अध्यक्षपदी मुबारक शेख गोरगाव, मुलुंड विभागातून वसिम अन्सारी, हरबरलाईन क्षेत्राध्यक्षपदी अरुण कौशिक याबरोबरच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्षपदी इम्रान कोतवाल यांची निवड जाहीर करण्यात आली. सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकांत घेवारे आणि सुनिता कोकाटे यांची तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन कांबळे चिपळूण , रिझवाज मुजावर रत्नागिरी, खजिनदारपदी डाॅ. सुनील सावंत चिपळूण, सरचिटणीसपदी श्री अजय बाष्टे रत्नागिरी, सदस्यपदी मिलींद सकपाळ, जाफरभाई गोठे, शकिलभाई तांबे आदींची निवड करण्यात आली.
सुरवातीला आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांगली जिल्हा कार्यकारिणीतर्फे उपस्थिताचे गुलाबपूष्प देऊन स्वागत करण्यात आले.राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्दुल शेख यांनी प्रस्तावनेमध्ये युनीटी, जस्टीस आणि राईट्स या तीन तत्वांवर अधारीत असलेल्या संघटनेचे उद्दीष्ट आणि ध्येय विषद केले. तर राष्ट्रीय अध्यक्ष विवेक म्हमाणे पाटील यांनी संघटनेच्या पर्यायाने पत्रकारांच्या हितासाठी आज ठोस काम करण्याची गरज असून क्षणिक विचार न करता भविष्याचा विचार करुन संघटनेची कार्य पद्धती असेल असे स्पष्ट केले. उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, सरचिटणीस विकास कुलकर्णी, खजिनदार जावेद मुजावर यांनीही मार्गदर्शन करताना आपला हेतू स्वच्छ असून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय अध्यक्ष विवेक म्हामाणे पाटील यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सदस्य यांची नावे जाहीर केली. तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शाहजहाँन आत्तार यांनी राज्य कार्यकारिणी, विभागीय आणि जिल्हा कार्यकारिणी निवड जाहीर केली. दुपारी सुग्रास प्रितीभोजनानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रामध्ये ६ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी चर्चा करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सांगली, मिरज येथील पत्रकारांनी केले. निवड झालेल्या सर्व पदाधिकारी पत्रकारांचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीसह, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच फ्रेश न्यूजचे प्रविण किणे उपस्थित होते.