सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय विविध क्षेत्रांतील पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न 

अहमदनगर : प्रतिनिधी 

संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांना मागदर्शन करून यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा सरपंच संघटीत चळवळीचे प्रणेते बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर संपन्न झाला सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यंदाचा "मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा" राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२१-२०२२ हा माऊली संकुल सभागृह अहमदनगर या ठिकाणी दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता कोरोनाच्या नियमांचे पालन करून दिमाखात संपन्न झाला. 

सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, क्रिडा,अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. पत्रकारिता क्षेत्रातील शिवराज पाटील पवार यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना यावर्षीचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी बाबासाहेब पावसे,आचार्य महंत महामंडलेश्वर जगद्गुरू डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज नाशिक यांच्या शुभहस्ते, दिपक दादा पाटील, ह.भ.प.राधाताई सानप महाराज, डॉ.राधेश्याम गुंजाळ, राजाराम भापकर गुरूजी, विजयकुमार तनपुरे महाराज, लाभेल ओटी, यादवराव पावसे, सुरेशराव कोते, विजयाताई काचावार, एकनाथराव ढाकणे, धनंजय डि. विसपुते, प्रमिला एखंडे, करूणा धनंजय मुंडे, रोहित संजय पवार, काशिनाथ पावसे आदींची उपस्थिती होती.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या पत्रकारीतेतील कार्याची दखल घेऊन त्यांच्या व सामाजिक क्षेत्रातील चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून व त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog