जे. एम. म्हात्रे चॅरीटेबल संस्था व नायर आय हॉस्पिटल कडून मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

पनवेल : शंकर वायदंडे 

कोपरे तालुका उरण येथे जे. एम. म्हात्रे चॅरीटेबल संस्था यांच्या पुढाकाराने नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, नवदृष्टी सेवा संस्था यांच्या माध्यमातून साइट सेव्हर्स इंडिया यांच्या "राही" या उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतामध्ये जड वाहतूक करणाऱ्या चालकांच्या साठी "नॅशनल ट्रकर्स प्रोग्राम" च्या अंतर्गत कोपर, तालुका उरण येथे अवजड वाहन चालकांसाठी "मोफत डोळ्यांची तपासणी शिबीर" आयोजित केले होते. या शिबीराचे उदघाटन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. ज्या वाहनचालकांना चष्मा आवश्यक आहे त्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे डॉ. संतोषकुमार नायर यांच्या मेडिकल टीम अंतर्गत डॉ. प्रियंका रावराणे, कॅम्प कॉर्डिनेटर सौ. मनस्वी भिगार्डे, ओप्टोम स्नेहा पाटील, ओप्टोम आनंदी नाडार, कॅम्प कोऑर्डिनेटर श्री. प्रशांत गायकवाड तसेच जे. एम. म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचे श्री मंगेश अपराज, श्री. आकाश पाटील, श्री. प्रशांत कोळी उपस्थित होते.

Popular posts from this blog