क्लॅरियंट कंपनीचे महामार्गावर अतिक्रमण, जागा बळकावण्याचा प्रयत्न! 

धाटाव/रोहा : किरण मोरे

धाटाव औद्योगिक परिसरातील क्लॅरियंट कंपनीने कंपाऊंडच्या बाहेर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. 

या कंपनीच्या हद्दीच्या बाहेर महामार्गालगत सुमारे ६०० मीटर लांबीपर्यंत लोखंडी पाईपचे कंपाऊंड बांधून बेकायदेशिररीत्या जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. यासंदर्भात क्लॅरियंट कंपनीचे अधिकारी अभिजीत जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच माहिती नसल्याचा दिखावा केला. तसेच, एच आर मॅनेजर बडकस यांच्याशी संपर्क साधसा असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

त्यानंतर एम आय डी सी चे अधिकारी एन. के. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या कामासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. 

क्लॅरियंट कंपनीने येथे मनमानीपणा सुरू ठेवल्याचे दिसून आलेले आहे.

Popular posts from this blog