ग्रामसेवक निघाला चोर!
सोनसाखळी चोरीप्रकरणी ग्रामसेवक पोलीसांच्या ताब्यात
न्यूज २४ तास : प्रतिनिधी
ग्रामसेवक भ्रष्टाचार करतात, लाभार्थ्यांना लुबाडतात, शासनाची दिशाभूल व फसवणूक करतात, दारूच्या पार्ट्या करतात असे आपण नेहमीच ऐकत असतो. पण आतात तर एक ग्रामसेवक चोरी पण करतात अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
नाशिकमधील गंगापूर रोडवरील सावरकर नगर परिसरात विपुल रमेश पाटील ह्या शिकाऊ ग्रामसेवकाला गंगापूर पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ५ सोनसाखळ्या व एक मोटारसायकल असा ४ लाख ९४ हजार ५५९ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात घेतलेले १४ लाख रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी ही चोरी केल्याची कबूली त्याने पोलीसांना दिली. त्याने अजून कुठे-कुठे चोरी केलीय व त्याचे कोण-कोण साथीदार आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.