मुंढानी गावचे हिराचंद्र कुथे (भगत) यांचे अपघाती निधन

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

मुंढानी गावचे रहिवाशी हिराचंद्र (भगत) चांगु कुथे यांचे रात्री वयाच्या ५२ व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिराचंद्र कुथे हे शिहू विभागातील गणपती कारखानदार म्हणून प्रसिद्ध होते. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, हसतमुख व मनमिळाऊ होते. त्यांना सामाजिक व आध्यत्मिक कार्याची आवड होती. सर्वांच्या अडीअडचणीत ते नेहमी धावून जात असत. त्यांच्या अचानक अपघाती निधनाने मुंढानी गावासह शिहू विभागावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.

Popular posts from this blog