पुई गावाचे विठोबा महाडीक यांचे दुःखद निधन
कोलाड : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील पुई गावातील प्रगत शेतकरी विठोबा महादू महाडीक यांचे गुरुवार दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षाचे होते. ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते व सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी रायगड जिल्ह्यातील भोई समाज बांधव, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व समस्त पुई ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक नातू, नात, सून, एक मुलगी, पतवंडे व मोठा महाडिक परिवार आहे.
त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.१ जानेवारी तर उत्तकार्य विधी मंगळवार दि.४ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या पुई येथील निवास्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून प्राप्त झाली आहे.