यशवंतखार येथे कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
गोफण/रोहा : रोहित कडू
रोहा तालुक्यातील यशवंतखार येथे ५५ किलो वजनी गट सामने २३ डिसेंबर २०२१ रोजी रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी श्री. नंदकुमार म्हात्रे, श्री. हेमंत ठाकुर, श्री. मिलिंद दिवकर, श्री. दिनेश मढ़वी, श्री. पांडुरंग धूमाश, श्री. दिनेश म्हात्रे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
या स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक जय हनुमान आमडोशी, द्वितीय क्रमांक वाघेश्वर रोठ (खु), तृतीय क्रमांक जय हनुमान बोरी पेण, चतुर्थ क्रमांक ओमकार वेश्र्वी आलिबाग असे देण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री. पांडुरंग धूमाळ, दिनेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, विराज, विनायक, सागर, प्रशांत, सूरज तसेच श्री.भैरवनाथ यशवंतखार मंडळ आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.