रोहा तालुक्यातील भागीर्थी खार, गोफण, सानेगाव येथे अवैध वाळू उपसा सुरू, महसूल विभागाचे दुर्लक्ष!
वाळू माफीयांनी महसूल विभागाला विकत घेतलेय?
गोफण परिसरात वाळू माफीया जोमात, महसूल विभाग कोमात?
रोहा : समीर बामुगडे
रायगड जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे रोहा तालुक्यातील अवैध धंद्यांना उधाण आलेले असून या अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, रोहा तालुक्यातील भागीर्थी खार, गोफण, सानेगाव येथे रेती माफीयांनी धुमाकूळ घातलेला असून येथे सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यामुळे येथील वाळू माफीयांनी महसूल विभागाला विकत घेतले आहे का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
येथे सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असून वाळू माफीयांकडून महसूल विभागाला लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्याने येथे कारवाई होत नसल्याची सर्वत्र चर्चा आहे.