शिवसेनेकडून ग्रामीण विकासाची पूर्तता; पाणी पुरवठा योजनांसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर होणार
तळा : संजय रिकामे
शहरांचा सतत विकास होत असूनसुद्धा शहरातील लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात राहणाऱ्यांचे प्रमाण थोडे अधिकच आहे.साहजिकच आर्थिक नियोजनाद्वारा संपूर्ण तालुक्याचा विकास साधण्यासाठी ग्रामीण विकास अत्यंत आवश्यक ठरतो आणि म्हणूनच ग्रामीण समस्यांचे स्वरूप नीटपणे समजावून घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत यासाठी मूलभूत गरज म्हणून शिवसेनेने पाणी समस्येकडे लक्ष दिले असून पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडून तळा तालुक्यातील पाणी पुरवठा योजना मंजूर करून ग्रामीण विकासाला चालना दिली जाणार आहे.
रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी मंत्रालय येथे ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे निवेदन ना. पाटील यांना दिले या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी त्वरित या कामांना जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजने अंतर्गत प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदस दिले आहेत. त्यानुसार कुडे, मालुक, कासेवडी, चरई बुद्रुक, कुंभळे, बारपे, महुरे, महागाव, पाचघर, अडनाळे, मालाठे, दहीवली, तळेगाव, वरळ, बहुलेवाडी येथील पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी सांगितले.