पालीमध्ये मटका माफीयांचा धुमाकूळ, अवैध मटका जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष
रायगड : प्रतिनिधी
पालीमध्ये मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथील अवैध मटका जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
सुधागड तालुक्यातील पाली येथे सध्या बेकायदा मटका-जुगार सुरू असून अनेक तरूण व वयोवृद्ध या मटका जुगाराच्या आहारी गोल्याचे दिसत आहे. या मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन येथील मटका जुगाराचे धंदे बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी नागरिक व महिला वर्गाकडून केली जात आहे.