शरद पवार विचार मंच च्या पनवेल शहर जिल्हाध्यक्षा पदावर प्रा. चित्रा देशमुख
पनवेल : शंकर वायदंडे
शरद पवार विचार मंच च्या पनवेल शहर जिल्हाध्यक्षा पदावर प्रा. चित्रा देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
शरद पवार विचार मंच महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमितजी ढमाळ यांच्या हस्ते चित्रा देशमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी अमितजी यांनी सांगितले की ," दि. 12 डिसेंबर रोजी मा. शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे पद देण्याचे आले.
तसेच या वेळी प्रा. चित्रा देशमुख यांनी सांगितले की, विचार मंच चा जो हेतू आहे लोकजागर आणि समाज जागृती! त्याला या पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.