२० हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले!
न्यूज २४ तास : वेब टीम
ग्रामसेवक भ्रष्टाचार करतात, लाभार्थ्यांना लुबाडतात, शासनाची दिशाभूल व फसवणूक करतात, दारूच्या पार्ट्या करतात, ग्रामसेवक चोरी पण करतात असे आपण आजपर्यंत ऐकलेले असेलच, पण ग्रामसेवक "लाचखोर" पण आहेत हे सिद्ध करणारी घटना नुकतीच घडली आहे. या सर्व घटनांवरून असेच दिसून येतेय की, या ग्रामसेवकांना "भीक" लागलीय का? शासनाकडून मिळणाऱ्या पगारात यांना स्वतःचे कुटूंब सांभाळता येत नाही का? लुबाडणूकीसाठीच यांनी जन्म घेतलाय का? असे विवीध प्रश्न उपस्थित झालेले आहेत.
अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) ने रचलेल्या सापळ्यात ग्रामसेवक गळाला लागला आहे. ग्रामपंचायत निमगाव मड येथील ग्रामसेवक महेश रमेश महाले यास २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निमगाव मड येथील ग्रामसेवक महेश रमेश महाले यास तब्बल २० हजार रुपयांची लाच आले आहे. स्मशानभूमीच्या कामकाचे बील मंजूर करण्यासाठी आणि भरलेली अनामत रक्कम परत करण्यासाठी महाले याने तब्बल ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती ही रक्कम २० हजार रुपये करण्यात आली. तक्रारदाराने त्वरीत एसीबीशी संपर्क साधला. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार ग्रामसेवक कार्यालयात महाले हा २० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले गेला. त्यामुळे एसीबीने येवला पोलीस स्टेशनमध्ये महाले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.