रोहा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनिल पाटील यांना निलंबीत करण्याची तक्रार 

गृहमंत्र्यांकडून रायगड पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश 

ड्युटी कशी करावी याचा पोलीसांना विसर पडलाय?

रायगड : किशोर केणी 

ड्युटी कशी करायची याचा पोलीसांना विसर पडल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली असून योग्य प्रकारे ड्युटी करायची सोडून भलतेच उद्योग करणे हे रोहा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनिल पाटील याला आता चांगलेच महागात पडले आहे. या पोलीसाविरूद्ध "न्यूज २४ तास मराठी" वेब मिडीया ने केलेल्या तक्रारीची महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतली असून याप्रकरणी सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

"न्यूज २४ तास मराठी" वेब न्यूज पोर्टलमध्ये "ग्रामसेवक" या विषयावर बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्यामध्ये "ग्रामसेवकांच्या फार्म हाऊसमध्ये दारूच्या पार्ट्या चालतात!" हा विषय नमूद करण्यात आला. या बातमीच्या विरोधात पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, अथवा "दिवाणी" स्वरूपाच्या तक्रारींमध्ये इंटरफेअर करण्याचा कोणताही अधिकार पोलीसांना नाही. पण असे असताना देखील रोहा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनिल पाटील यांनी घाबरविण्याच्या उद्देशाने पत्रकारांना वारंवार कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला व तुमच्याकडे या बातमीचे पुरावे असतील तर ते घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या असे म्हणून कारवाईची भिती दाखवून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर संबंधित पत्रकारांनी स्पष्ट सांगितले की, "पुरावे देण्याचा विषय असेल तर ते आम्ही कोर्टापुढे सादर करू, बातमीमुळे कुणाचीही बदनामी होत असेल तर त्यांनी कोर्टाकडे दाद मागावी!" पण तरीही "मी पोलीस आहे, मला पुरावे द्यावेच लागतील!" असे म्हणून त्यांनी ठाणे अंमलदार या पदाचा दुरूपयोग करण्याचा केला. "दिवाणी" आणि "फौजदारी" अशा दोन प्रकारच्या तक्रारी असतात. त्यांपैकी "दिवाणी" स्वरूपाच्या तक्रारींमध्ये ढवळाढवळ करण्याचा पोलीसांना अधिकार नाही, पण तरीही पोलीस नाईक सुनिल पाटील यांनी तसे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

परिणामी कायदा, सुव्यवस्था आणि शांतता काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने भविष्यात असे प्रकार घडू नये याकरिता पोलीस नाईक सुनिल पाटील यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना निलंबीत करावे अशी तक्रार "न्यूज २४ तास मराठी" वेब मिडीयातर्फे करण्यात आली होती. या तक्रारीची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली असून याप्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Popular posts from this blog