कामोठे गावच्या प्रलंबित समस्या सोडवल्याशिवाय कामोठे नोडचा महापालिकेस सिडको हस्तांतरणास ग्रामस्थांचा विरोध
पनवेल : शंकर वायदंडे
कामोठे गावच्या प्रलंबित समस्या विषय राजेश नारायण गायकर राहणार कामोठे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक, बेलापुर यांना अर्ज केला कि कामोठे गाव हे पनवेल तालुक्यातील एक सर्वात मोठे प्रकल्पग्रस्त गाव आहे. गाव मोठे असल्याने गावातील अनेक समस्याही मोठ्या आहेत.
आज कामोठे विभागाचा सिडको कडून महापालिकेकडे हस्तांतरणाचा विषय अंतिम टप्प्यात आहे तरी या आमच्या सिडको प्रकल्पग्रस्त गावाच्या समस्या प्रलंबित ठेवून कामोठे विभागाच्या हस्तांतरणास आमचा तीव्र विरोध आहे.
प्रलंबित मागण्या
पालिका प्रकल्पग्रासतांची बांधकामे तोडणार नाही याची हमी सिडकोने द्यावी
शासनाकडे गेली 30 वर्षे येथील प्रकल्पग्रस्त गावांची वाढीव गावठाणे निर्देशीत करण्यासाठी आणि गरजेपोटीची नैसर्गिक बांधकामे नियमित करण्यासाठी मागणी करीत आहोत, आमच्या गावा मध्येही अशी नैसर्गिक गरजेपोटीची बांधकामे आहेत आपण हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याआधी वाढीव गावठाणे निर्देशीत करून त्यातील सर्व बांधकामे सरसकट नियमित करावीत.भविष्यात नवी मुंबई शहरास स्वतःची कसती जमीन कवडिमोल भावाने देऊन भूमिहीन झालेल्या इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे एकही बांधकाम पालिकेने तोडता कामा नये याची हमी Cidco ने घ्यायला हवी
कामोठे गावासाठी खेळाचे मैदान
कामोठे गावास लागून दोन बाजूस पूर्वी खेळाची मैदानं होती ज्यावर गावातील तरूण क्रिकेट, व्हॉलीबॉल वा तत्सम खेळ खेळत होते आज शहरीकरणात या गावाभोवती मैदानच राहिलेले नाहीत तरी कामोठे गावासाठीचे खेळाचे मैदान तातडीने आरक्षित करावे
गावाच्या भोवताली पार्किंग प्लॉट मिळावेत
गावात आळी आणि अथवा विभाग आहेत ज्यामध्ये अरुंद रस्ते व गल्ल्या आहेत.पूर्वी गावात सायकल व स्कूटर इतपत वाहतूक व्यवस्था असल्याने मुख्य व रस्ता सोडला तर सर्वत्र अरुंद गल्ली वजा रस्ते आहेत. आज मितीस सर्व घरात उदरनिर्वाहासाठी रिक्षा आल्या आहेत तसेच काहींनी शाळेसाठी वॅन व खाजगी चारचाकी गाड्या घेतलेल्या आहेत.मात्र गावात अरुंद गल्यांमुळे सर्व गाड्या मुख्य रस्ता,पालखी रस्त्यांना व गावाभोवतीच्या रस्त्यांना नाईलाजाने उभ्या केल्या जातात.या पार्किंग समस्येमुळेच गावात अब्युलंस फिरणे मुश्कील झालेले आहे.तरी गावाभोवती मोकळे असलेल्या भुखंड गावकऱ्यांना वाहनतळासाठी तातडीने आरक्षित करावे असे वाहनतळ गाव मोठा असल्याने गावाच्या चारही बाजूस द्यावे.
प्रकल्पग्रसतांसाठी कम्युनिटी सेंटर बनवावे
सिडकोने विविध नोड मध्ये शहरांमध्ये तसेच प्रकल्पग्रस्तां करिता भूमिपुत्र भवन,आगरी कोळी भवन असे कम्युनिटी सेंटर बनवलेले आहेत या कम्युनिटी सेंटर मधून प्रकल्प ग्रस्त लग्नसोहळे,वाढदिवस, व्यायामशाळा, वाचनालय व समाज प्रबोधनाचे काम चालवले जातात. येथील प्रकल्पग्रस्तां करिता असे कमुनिटी सेंटर सिडकोने बनवावे.
गावासाठी पाण्याची लाईन व टाकी
कामोठे गावात बारा महिने पाणी टंचाई असते. 1996 सालची गावाची पाईप लाईन आता जीर्ण झालेली आहे. ग्रामपंचायत असताना 2009 साली तिची डागडुजी झालेली स्मरणात आहे.आज ती ठिक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहे यामुळे गावात पाणी मुबलक मिळत नाही. तसेच पाण्याचा साठा करण्यासाठी लोकवर्गणी द्वारे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत बनवलेली पाण्याची टाकी निरूपयोगी ठरल्याने तिचा वापर करण्याजोगा नाही. तरी आपण सदरची पाण्याची जुनी लाईन काढून नवीन पाण्याची लाईन टाकून द्यावी व गावात पाण्याची नवी टाकी बांधून द्यावी.
आमच्या या मागण्यांचा आपण हस्तांतरण प्रक्रियेआधी सहानभुतीने आणि गांभीर्यपूर्वक विचार करावा.
आपण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यास आमचा ग्रामस्थांचा विरोध राहील.आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करू तरी आपण ती वेळ येथील शहर वसवण्यासाठी त्याग सोसलेल्या प्रकल्पग्रस्तांवर आणू नये असा इशारा वजा अर्ज राजेश नारायण गायकर यांनी केला.