नगरपंचायत निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ संपली आता प्रचाराचा घुमशान


तळा : संजय रिकामे

गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळण्यासाठी सुरू असलेली सेटिंग… त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सुरू झालेली धडपड…. नंतर अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी… अमिषांचं गाजर… अशा सर्व गोंधळात अखेर आज अर्ज मागे घेण्याची वेळही संपली आहे. त्यामुळे आता नगरपंचायत निवडणुकीचा शहरभर धुरळा उडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सख्खे मित्रं, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात लढतानाचे चित्रंही दिसणार आहे. काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी थेट चौरंगी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. 

आज नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आले. त्यामुळे शहरातील अनेक भागात निवडणुका अटळ झाल्या आहेत या निवडणुकीत ३ अर्ज मागे घेण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक ७ मध्ये जोगवाडी पोळेकर मंगेश अपक्ष शिवसेना पुरस्कृत बिनविरोध निवड झाली आहे.  ४ प्रभागात तिरंगी ५ प्रभागात  दुरंगी ४  अशा चुरसीच्या लढती होणार आहेत. १२ प्रभागात  शिवसेना, राष्ट्रवादी,भाजपा , शेकाप, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी,व अपक्ष उमेदवारांमधे चुरसीच्या लढती होणार आहेत.

Popular posts from this blog